Breaking News

आश्‍वासनांची पुर्तता करण्याचे काम सुरू ः प्राजक्त तनपुरे


राहुरी न्यायालयाजवळील मुळा डावा कालव्यावरील आमदार चारी नं. 6 येथील साखळी क्रमांक 4. 360 ते 5.00 कि मी. मध्ये 1 कोटी 18 लाख रूपये खर्चाचा जॉगिग ट्रॅक तयार करण्यास पाटबंधारे विभागाने मंजूरी दिल्याची माहिती नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले की, आम्ही निवडणुकीत जनतेसमोर जाताना शहराचे विकासासाठी अनेक आश्‍वासने दिली होती, त्या आश्‍वासनाची पूर्तता करण्याचे काम सुरु असून त्यातील शहरात एक सर्वांसाठी फिरण्यास व व्यायामास स्वतंत्र अशी जागेसाठी मागणी केली होती. त्यासाठी राहुरी न्यायालयानजीक पाटबंधारेची या ठिकाणी असलेल्या चारीत 700 मीटर लांबीची 900 एम् एम् सिमेट पाइप टाकून तेथे सुशोभिकरण आणि स्वच्छ करून हा जॉगिग ट्रॅक करण्याचे पालिकेने निश्‍चित केले होते. यावेळी नगराध्यक्षांनी विविध कामांविषयीचा आढावा सादर केला. राहुरी शहरासाठी 29 कोटी रूपये खर्चाच्या सुधारीत पाणी योजनेचा प्रस्ताव मंजूरीसाठी शासन दरबारी प्रलंबित असून पालिकेची योजना मंजूर झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी तालुक्याचे आमदारांनी जाहीर केले होते, त्याबद्दल शहरातील त्यांच्या काही समर्थकानी सत्कार केला होता. परंतु याबाबत अद्याप ही योजना प्रलंबित असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्षा सुमती सातभाई, मुख्याधिकारी नानासाहेब महानवर, बाळासाहेब उंडे, गजानन सातभाई आदी उपस्थित होते.