Breaking News

हल्लाबोल आंदोलन- नगराध्यक्ष तनपुरेंचे तालुकाभर दौरे


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 15 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजीत करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात तालुक्यातील जनतेने सहभागी व्हावे यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी तालुकाभर दौरे सुरु केले आहेत, प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका सभा घेऊन केंद्र सरकार, राज्य सरकार यांची कार्यपद्धती विरोधात असलेल्या असंतोषा बद्दल जनजागृती करत आहेत. या दौर्‍यात जि. प. सदस्य शिवाजी गाड़े, तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ, प्रदेश कार्यकरणीचे अजीत कदम तसेच महिला आघाडीच्या निर्मला मालपाणी, सभापती मनीषा ओहळ, उपसभापती रविंद्र आढाव यांच्यासह आदी मान्यवर सहभागी होऊन आवाहन करीत आहेत. 15 फेब्रु. 2018 रोजी सायं. 5 वाजता राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे वतीने आयोजीत आंदोलनामध्ये राज्याचे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, मा. मंत्री जयंत पाटील, संपर्क नेते दिलीप वळसे, माजी खा. प्रसाद तनपुरे, राज्य युवती अध्यक्षा स्मिता पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आदिंसह जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, व्यापारी, कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी केंद्रातील व राज्यातील सरकार विरोधात तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन राहुरी येथे आयोजीत करण्यात आले असून आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, शेतमजुर महिला युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे व जि. प. सदस्य शिवाजी गाड़े यांनी केले आहे. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले की, तालुक्यात 13 वर्षापासून सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे त्यानी ह्या काळात कोणते प्रश्‍न मार्गी लावले असा सवाल करून त्यांना तालुक्याच्या प्रश्‍नांची काही देणे घेणे नाही. ह्या काळात लोकप्रतिनिधिंनी कोणते ठोस काम केले ते जनतेला सांगावे. देशात कांग्रेस पक्षाचे नेते भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार विरोध करीत असताना येथील लोकप्रतिनिधी मात्र काँग्रेस नेत्यांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहे.