आश्वी : प्रतिनिधी ;- महिला व मुलीवर अत्याचार व हल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे संभाव्य संकटांवर मात करुन मुली स्वत:चे रक्षण करण्यासाठी सक्षम झाल्या पहिजेत, हे ओळखून जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी जि. प.च्या माध्यमातून महिला व मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ आश्वी गटातील जास्ती-जास्त महिला व मुलींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हापरिषद सदस्या अँड. रोहिनी निघुते यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे सुभाष म्हसे, माधव गायकवाड, मिलिंद बोरा, राजेंद्र गायकवाड, कराटे प्रशिक्षक सागर थोरात, विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड, पर्यवेक्षक निर्मळ, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराटे प्रशिक्षण योजनेत भाग घ्या : अँड. निघुते
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:33
Rating: 5