Breaking News

जिद्द आणि चिकाटीरुपी पंखांना बळ द्या : पो. नि. लोखंडे


नेवासाफाटा प्रतिनिधी ;- जीवनात यशाची गरुडझेप घ्यायची असेल तर जिद्द व चिकाटीरुपी पंखांना अभ्यासाच्या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविणचंद लोखंडे यांनी केले. 
तालुक्यातील पिचडगाव-मक्तापूर येथील सुदर्शन इंग्लिश स्कूलच्यावतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते लोखंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी अंबादास गव्हाणे होते. यावेळी झालेल्या स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सरोदे, पिचडगाव शाळेचे मुख्याध्यापक संतोष मगर, शशिकांत मोरे, डॉ. रेवणनाथ पवार, दिगंबर पेहरे, कडूबाळ शेजूळ, उत्तमराव शिंदे, साहेबराव गव्हाणे, एल. आय. सी. चे अधिकारी बाळासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.