राहुरी तालुक्यातील महाशिवरात्री व ब्रम्हकुमारी सदगुरु माणिकगिरी महाराज यांच्या नवव्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने रविवारी दि. 11 फेबुवारी ते रविवार दि 18 फेबुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सप्ताह काळात दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत हरिकिर्तन होणार असून शनिवार दि. 17 फेबुवारी माणिकगीरी महाराज पुण्यतिथीनिमित्त दत्तगिरी महाराज (वरवंडी देवस्थान) यांचे तर रविवार दि. 18 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत दत्तगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान दत्तगिरी महाराज आणि समस्त ग्रामस्थ वरवंडी यांनी केले आहे.
वरवंडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
19:00
Rating: 5