सोनई /प्रतिनिधी /- सोनई येथे आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर कार्यालयाचा शुभारंभ "आमदार झाल्या सारख वाटतय" या गीताचे निर्माते डी.गोवर्धन यांच्या शुभहस्ते होणार आहे. हा कार्यक्रम आज दि.6 फेब्रुवारी १८ रोजी होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेता शिवाजी दोलताळे मला आमदार झाल्या सारख वाटतय फेम सायंकाळी सहा वाजता होणार असल्याची माहिती आपले सरकारचे संचालक संजय वैरागर यांनी दिली.
सोनई ग्रामसचिवालया समोर उपस्थिती म्हणून नेवासा पंचायत समिती सभापती सुनीता गडाख, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, सुरेखा साळवे, तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी मुंडे ,सरपंच संगीता वैरागर, आदी मान्यवरांचा उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कन्यारत्न चित्रपटाचे निर्माते डी. गोवर्धन सोनईत
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:14
Rating: 5