डॉ. निलेश शेळके यांच्यावर गुन्हा दाखल? अर्बन आणि शहर बँकेची कोट्यावधी रूपयांची फसवणूक
अहमदनगर ;- येथील डॉक्टर निलेश शेळके यांनी नगर अर्बन बँक आणि शहर सहकारी बँकेत मॉरगेज प्रकरणी तीन डॉक्टरांची फसवणूक केली असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सोमवारी उशीरा रात्री कोतवाली पोलिस स्टेशनला सुरु होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील डॉक्टर निलेश शेळके यांनी शहरातील डॉक्टर चेडे, डॉ.सोनवणे, डॉ.मोहळे या तिघांची फसवणूक केली असल्याची चर्चा आहे. याबाबत कोतवाली पोलिसांकडून माहिती घेतली असता सध्या तरी गुन्हा दाखल केलेला नाही, मात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शहरात ही चर्चा सोशल मिडीयावर चांगलीच रंगली होती.

या प्रकरणात डॉक्टर शेळके यांनी अर्बन बँक आणि शहर बँकेची कोटयावधी रूपयांची फसवणूक केली असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये शहरातील एक पत्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या या पत्रकाराची मालमत्ताही बँकेकडे मॉरगेज दिली असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणामुळे शहरात विविध तर्क वितर्कांना उधाण आले होते.