Breaking News

मनसेतर्फे मराठी व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन शिबीर


27 फेब्रुवारी ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहरअध्यक्ष संदिप पाचंगे यांनी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी तरुणांनी उद्योजक व्हावे या हेतूने ठाणे शहरातील मराठी यशस्वी उद्योजकांमार्फत नवीन तसेच स्वत: व्यवसाय करणा-या मराठी व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीसंदर्भात ठाण्यातील लुईसवाडी येथील शहनाई हॉलमध्ये 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 9 दरम्यान विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. मराठी पाट्यांचा आग्रह करत असताना मराठी व्यावसायिक घडविले पाहिजेत या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, हॉटेल्स, आरोग्य, शेअर मार्केट, लग्न समारंभ इत्यादी क्षेत्रांमधील ठाण्यातील यशस्वी उद्योजकांकडून या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे