Breaking News

विवाहित महिला मुलीसह बेपत्ता


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी :- तालुक्यातील अशोक सहकारी कारखाना येथून एक विवाहित महिला सहा वर्षांच्या मुलीसह कोणालाही न सांगता निघून गेली आहे. योगिता लिंबाजी ढाकणे ( वय २७, रा. काटेवाडी, ता. पाथर्डी) असे या विवाहितेचे नाव आहे. या ६ वर्षांच्या भक्ती या मुलीला घेऊन ही महिला दि. ५ फेब्रुवारी रोजी कोणालाही न सांगता अशोक सहकारी कारखाना, अशोकनगर येथून रात्री ९ वाजता निघून गेली आहे. तिचा वर्ण गोरा असून तिच्या अंगावर जांभळ्या रंगाची साडी, निळा ब्लाउज असा पोशाख तिने परिधान केलेला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. ही महिला कोणाला दिसल्यास श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस नाईक बढे आणि पोलीस कॉ. जाधव हे करीत आहेत.