Breaking News

सेमफोर्ड स्कूलचे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन संपन्न विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीने कार्यक्रम उत्साहात साजरा


सेमफोर्ड स्कूल ही एक नवनवीन उपक्रम राबविणारी शाळा म्हणून जामखेडकरांना परिचीत आहे. शाळेतील मुलांचा सर्वांगीण विकास व विविध प्रकारच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या शाळेत नेहमीच नवीन उपक्रम राबविण्यात येतात. या कार्यक्रमाद्वारे समाजात आधुनिकतेचे संदेश देण्यात येत असून, पालकांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळून ते समाधानी होत असल्याने शाळेची चांगली प्रगती होत आहे. मुलांना शालेय ज्ञानाबरोबरच सामाजिक ज्ञान मिळावे हा असे कार्यक्रम घेण्यामागचा हेतू असून, शाळेचा हा 6 वा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा उपक्रम असल्याची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कैलास माने यांनी दिली. या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलणाने करण्यात आली. या स्पर्धेत शिशू वर्गापासून ते 6 वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते.स्पर्धेसाठी वर्षा माने, सविता बेदमुथ्था, आशा वायकर, कोमल यादव यांनी परिक्षक म्हणून काम पहिले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बाळासाहेब साळवे, सचिन चव्हाण सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रश्मी गंभीर, जास्मिन आहुजा यांनी मानले.