Breaking News

आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे राष्ट्रकुल संसदीय मंडळ युरोपच्या अभ्यास दौर्‍यावर


संगमनेर प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषदेतील आमदारांचे राष्ट्रकुल संसदीय मंडळ युरोपच्या दहा दिवसांच्या अभ्यास दौर्‍यावर मुंबई येथून रवाना झाले. लोकशाहीमधील सर्वांत महत्वाचे असलेल्या विधानसभा व विधानपरिषदेतील आमदारांचे राष्ट्रकुल संसदीय मंडळात दहा आमदारांचा समावेश आहे. आ. थोरात हे १९८५ पासून विधान सभेचे सलग ७ व्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. ते सध्या विधानसभेतील वरिष्ठ आमदार आहेत. या अभ्यासदौर्‍यात इंग्लड, पॅरिस यांसह युरोपमधील विविध देशांच्या संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास केला जाणार आहे. आ. थोरात यांच्या या निवडीचे राज्यभरात स्वागत होत आहे. यामुळे संगमनेरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.