बाजारपेठेतील ‘त्या’ ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश करा : मागणी
संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत हा व्यवसाय चालतो. उच्चभ्रू समाजातील एक महिला गेल्या काही महिन्यांपासून आपल्या निवास्थानी हा व्यवसाय चालवत आहे. पूर्वी आठवड्यातून ठराविक दोन दिवशी हा व्यवसाय चालायचा. मात्र आता दररोज बिनधास्तपणे हा व्यवसाय सुरु आहे. बाजारपेठेतील या अड्डयावर विविध ठिकाणच्या महिला, महविद्यालयीन तरुणी, वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक कामानिमित्त ये-जा करत असतात. दरम्यान, एका दरवाजाने जायचे आणि ‘काम’ झाल्यावर दुसर्या दरवाजाने निघून जायचे असा प्रकार या घरात सुरु आहे. सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. मात्र या व्यवसायाची व्याप्ती वाढत चालल्याने नागरिक संताप व्यक्त करतांना दिसत आहेत.
उच्चभ्रू समाजातील या महिलेचे अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी ‘कनेक्शन’ आहे. गरजेप्रमाणे ‘माल’ पुरविण्याचे काम ही महिला करते. या बदल्यात तिला मोठी रक्कम मिळत आहे. याठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु झाल्याने परिसरातील रहिवाशी वैतागून गेले आहेत. पोलिसांनी त्वरित लक्ष घालून संबंधित महिला व या ठिकाणी येणार्या नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.