Breaking News

‘गार्डनर’विषयी व्यावसायिक विनामूल्य प्रशिक्षण


लोणी।प्रतिनिधी :- कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे दि.२० पासून गार्डनर अर्थात बागकाम याविषयी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनी दिली. भारत सरकारच्या केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्रालयाच्या भारतीय कृषी कौशल्य परिषद नवीदिल्लीअंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. युवकांना बागकाम क्षेत्रात चांगली संधी आहे. प्रशिक्षित उमेदवारांना हमखास नोकरीची संधी मिळू शकते. विविध ठिकाणी आज गार्डनरची मागणी वाढत आहे. यामध्ये खासगी कंपन्या, रोपवाटीका, शासकीय निमशासकीय संस्था या ठिकाणी गार्डनरसारख्या कुशल कारागिरीची गरज निर्माण झाली आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून शैक्षणिक पात्रता किमान पाचवी आहे. कागदपत्रांमध्ये आधारकार्ड, दोन फोटो आवश्यक आहेत. यासाठी प्राधान्याने २० प्रशिक्षणार्थिंना प्रवेश द्यावयाचा आहे. गरजूंनी प्रवेशासाठी केंद्राशी प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा {०२४२२-२५२४१४ किंवा २५३६१२} या फोनवर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे