Breaking News

गॅलक्सी इंग्लिश मेडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


तालुक्यातील हळगाव येथील ज्ञान ज्योती ग्रामीण विकास प्रतिष्ठान जामखेड संचलित गॅलक्सी इंग्लिश मेडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व गुणसंपन्न विदयार्थी यांचा बक्षीस वितरण व सन्मानसोहळा महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अ. नगरचे पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजप ता. अध्यक्ष रवि सुरवसे, पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, जि. प. सदस्य सोमनाथ पाचारणे, डॉ. झेंडे, सोनेगावचे संरपच चतुर्भुज बोलभट, गॅलक्सी स्कूलचे अध्यक्ष डॉ. अल्ताफ शेख यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी चिमुकल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, विद्यार्थी चे पालक शालेय स्कूलचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गॅलक्सी स्कूलचे शिक्षक राठोड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अल्ताफ शेख यांनी मानले. प्रा. ना. शिंदे यांनी शाळेच्या व्यवस्थापन तसेच ग्रामीण भागात सुध्दा उत्तमात उत्तम शैक्षणिक दर्जा देऊन विद्यार्थी घडवत असल्याने व गॅलक्सी ही शाळा प्रगती पथावर जाऊन आयएसओ मांनाकन मिळवून उत्तम शैक्षणिक काम करीत आहे. तसेच ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षण देणारी संस्था स्थापन करून उत्तम उत्तम शैक्षणिक काम करून या परिसरातील विद्यार्थी घडवून उत्तम शैक्षणिक काम करत असल्याने या कार्यासाठी संस्थापक अध्यक्ष अल्ताफ शेख यांना शुभेच्छा दिल्या.