Breaking News

सेनापती करियर अकॅडमी च्या वतीने ग्राम स्वछता अभियान

येथील सेनापती करियर अकॅडमीच्या वतीने शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच ग्राम स्वछता अभियान राबवून साजरी करण्यात आली. आरोग्याचे तसेच पर्यावरणाचे महत्व समजावे म्हणून युवक युवतींनी पारनेर ते पानोली हे अंतर मॅरेथॉनच्या माध्यमातून पूर्ण केले. यावेळी हसनजी राजे यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरूवात केली. पाणोली गावात आगमन झाल्यावर ग्रामस्थ व सरपंच अर्चना अंकुश गायकवाड यांनी मुलांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमला सुरवात करण्यात आली. पानोली गावातील माजी सैनिक यांचा सेनापती अकॅडमी तर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी सेनापती अकॅडमी चे संचालक प्रा. रामदास आढागळे यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांचे काम आजही जगाला दिशा व प्रेरणा देणारे आहे. स्वछता, पाणी व्यवस्थापन, वृक्षारोपन ही कामे शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपुर्वी करून ठेवले आहेत. आपल्या प्रत्येक प्रश्‍नाला देखील शिवाजी महाराजांच्या कार्यातून उत्तर सापडते. प्रा. प्रकाश शेडगे यांनी या वेळी सेनापती संस्थेची माहिती सांगितली, युवकांनी राजेंचा आदर्श घेतला तर कोणत्याही अडचणींवर सहज मात करू शकता असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पाणोलीच्या सरपंच अर्चना अंकुश गायकवाड यांनी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्या दिल्या. यावेळी बाबासाहेब शिंदे, भरत वाखारे, भाऊसाहेब नाईकवाडी, नार्शीग शिंदे, पांडुरंग थोरात, किसन भगत, दादाभाऊ शिंदे, भाऊसो शिंदे, विजय शिंदे, संतोष शिंदे, सचिन कळोखे, शिवाजी थोरात, इंद्रभान थोरात, भरत चौधरी, इंद्रभान गायकवाड, नारायण गायकवाड, रामराव गायकवाड, समीर झगडे, संजय थोरात, संदीप शिंदे, तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. पंढरी बालसाने यांनी मानले.