Breaking News

गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला चाबकाचाही फरक पडणार नाही - धनंजय मुंडे

नाशिक - आज बर्‍याच दिवसाने चाबुक हातात आला असून या चाबकाला एकवेळ बैल बुजतो आणि कधी वाघ समोर आला तर चाबकाला घाबरतो परंतु सत्तेत जर गेंडा असेल तर या चाबकाने त्याचे करायचे काय, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निफाडच्या जाहीर सभेत जनतेला केला.

 हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा दिवस आणि निफाडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी माजी आमदार दिलीप बनकर यांनी सत्ताधार्‍यांचे वाभाडे काढण्यासाठी चाबुक भेट दिला. त्या चाबकाचा धागा पकडत धनंजय मुंडे यांनी चाबकाचे फटकारे सरकारवर ओढले.

या देशात आणि राज्यात महागाईचा आगडोंब उसळला आहे.रेशनवरील डाळ,साखर,तांदुळ,रॉकेल जनतेचं सरकारने बंद केले आहे.आणि दुसरीकडे जो मका आपण गाई-गुरांना खायला घालतो तो मका हे मोदी-फडणवीस आपल्याला खावू घालत आहेत.त्यामुळे जनतेने काय करायचे याचा विचार करायला हवा असेही मुंडे म्हणाले.


त्यांनी आपल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा श्रीपाद छिदम याचा समाचार घेतला.आज त्याला अटक कराल,त्याला पक्षातून निलंबितही केले आहे,त्याला आतमध्ये काही दिवस ठेवाल. परंतु महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणार्‍या त्या छिदमची जीभच छाटली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.कोणपण उठून क ाहीही बोलत आहे. आणि त्याविरुध्द आंदोलन करणार्‍या आमच्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. पोलिसांना मी सांगू इच्छितो,आमच्या लोकांना त्रास देवू नका,मौका सभी को मिलता है,वेळ आमचीही येणार आहे हे लक्षात ठेवा.त्यावेळी शोलेमधील धर्मेद्राचा डॉयलॉग आठवा,चुन चुन के मारेंगे असेही मुंडे यांनी भाषणात स्पष्ट केले.