नेवासा/श. प्रतिनिधी/- पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या नेवासा तालुक्यातील १०६ खाजगी डॉक्टरांना खाजगी कृत्रिम रेतन सेवादाता प्रमाणपत्राचे वाटप पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सुनिता गडाख हया अध्यक्षस्थाना वरून बोलत होत्या. पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे, विक्रम चौधरी, बाळासाहेब चौधरी, पशुवैद्यकीय विभागाचे डॉ.संदीप वाजे, डॉ.प्रदीप मोराळे, डॉ.दिनेश पडूंरे, डॉ.मनोज शिंदे, डॉ. दत्ताजी जठार, डॉ. अविनाश मापारी, डॉ.बापूसाहेब वीर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी नेवासा पंचायत समितीचे पशुविकास अधिकारी डॉ.अमोल जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, खाजगी पशुवैद्यकीय डॉ.ईश्वर उगले, चांदा येथील डॉ.दहातोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी खाजगी डॉ.नंदकुमार गंधारे, डॉ.सोमनाथ महाडिक यांच्यासह खाजगी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पेश बोरकर यांनी आभार मानले.
पशुवैद्यकीय क्षेत्रातील खाजगी डॉक्टर शेतकऱ्याच्या हिताची सेवा देतात: सुनिता गडाख
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:59
Rating: 5