Breaking News

गुणवत्तापूर्ण विकासावर भर दिल्याने शाळेचा नाव लौकिक वाढला .


नेवासा/तालुका प्रतिनिधी/- गुरुकुल इंग्लिश स्कूलने गुणवत्तापूर्ण विकासावर भर दिल्याने अल्पावधीतच शाळेच्या नाव लौकिकात भर पडली आहे . असे वक्तव्य नानासाहेब रेपाळे यांनी केले. तालुक्यातील घोडेगाव येथील गुरुकुल इंग्लिश मेडिअम स्कुलचे नववे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार,११फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना नानासाहेब रेपाळे म्हणाले की इमारत, क्रीडांगण, लॅब, डिजिटल क्लास रूम, उच्च प्रशिक्षित शिक्षकवर्ग व प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रवीण ढाले यांनी करून शाळेच्या विविध व वैशिष्ट्य पूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बेटी बचाओ-बेटी पढावो, मेरी बेटी-मेरा अभिमान या उपक्रमातील माता व विद्यार्थिनींच्या फोटो फलकाचे उपस्थित पाहुण्यांनी कौतुक केले. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष विष्णू कराळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पल्लवी सोनवणे यांनी केला. 

बक्षीस वितरनामध्ये विविध खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडू व संघास आणि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यास पदक , चषक , प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांच्या आजोबांना आमंत्रित करण्यात आले होते.रामदास जरे, झुंबरराव शेळके, जाफरभाई शेख, नानासाहेब डांगे, धोंडीराम सोनवणे, चांगदेव आठरे , कचरू पुंड , बापूराव सोनवणे , बाबासाहेब झिने तर उपस्थितांमध्ये माजी उपसभापती दिलीप लोखंडे, कांगुणीचे सरपंच आण्णासाहेब शिंदे, अण्णासाहेब बोरूडे, पप्पूशेठ शेख, राजू लांडे, दिलीप शिंदे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील बोरूडे व सर्व सदस्य उपस्थित होते.सूत्रसंचालन सारिका बोरूडे तर आभार प्रदर्शन मीनाक्षी कारले यांनी केले.