नेवासा /शहर प्रतिनिधी/- शिर्डी येथील वाळु पथकातील महसुल कर्मचाऱ्यांवर हल्याचा नेवासा महसुल संघटनेने केला निषेध. त्यांनी आरोपीच्या अटकेची मागणी केली. उपविभागीय अधिकारी शिर्डी आदेशानुसार वाळु पथकाने वाळु वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याकरीता तेरा फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील वारी येथे शासकीय वाहन घेऊन गेले होते. या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला असता डंपर चालक व मालक व त्यांच्या साथीदारांनी महसूल पथकावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असून सदर आरोपी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप सर्व आरोपींना अटक झालेली नसल्याने त्यांना त्वरित अटक करावी व कठोर कारवाई करावी. असे निवेदन महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार नारायण कोरडे यांना देण्यात आले. निवेदनावर विभागीय अध्यक्ष अतुल भांगे, अध्यक्ष सुनील देसाई, मिलिंद नवगीरे, बुद्धानंद धांदोरे, संतोष लहारे, हरिदास पांढरे, रमेश माळी, अशोक पायगुडे, धरम सुलाने, आनंदसिंग गुसिंगे, सुरेश फंड, गीते, खोमणे,जाईकाहर आदींच्या सह्या आहेत
शिर्डी वाळु पथक हल्ला निषेध;आरोपीच्या अटकेची केली मागणी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:15
Rating: 5