बहिरोबावाडीतील शिक्षकाच्या मृत्यूचे गुढ कायम ! संस्था चालकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न? सोशल मिडियात चर्चा
कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील बळीराम लालासाहेब पेटकर या शिक्षकाचा भिगवण येथे मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. भिगवणच्या आदर्श विद्या मंदिर शाळेत ते कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे गुढ अद्याप उकलले नसुन भिगवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पेटकर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? याबाबत सोशल मीडियातून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिक्षकांच्या विविध प्रश्नांनाही यातून वाचा फुटत आहे.
दै. लोकमंथनमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर सोशल मीडियावर चर्चा घडून आली. संस्था चालकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा संशय सोशल मीडियातून विचारला जात आहे. पेटकर यांच्याबरोबरचे इतर शिक्षक संस्थेने सेवेत कायम केले, परंतु या शिक्षकाला कायम केले नसल्याने तो तनावाखाली होता. शिक्षकांचा हा प्रश्न गंभीर असून सामाजिक प्रश्न म्हणून याकडे पाहिले पाहिजे. या प्रकरणाची सीबीआय अथवा एलसीबीकडून चौकशीची मागणी कर्जत तालुक्यातील कर्जत तालुका अध्यापक संघ या शिक्षकांच्या व्हॉटस् अॅप गृपवर करण्यात आली. पेटकर यांच्या मृत्यूने एक कुटूंब उध्वस्त झाले असुन, शिक्षक संघटनेने यात पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या अंत्यविधीसाठी संस्थाचालक अथवा एकही संचालक अथवा प्रतिनिधी उपस्थित नसल्याचा प्रश्नही प्रा. संदीप भिसे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शिक्षकांचे विविध प्रश्न या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. शिक्षक संघटनांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणीही करण्यात आली.