आ. बच्चू कडू प्रणित प्रहारच्या अपंग आंदोलन कर्जत तालुकाध्यक्षपदी मिरजगाव येथील बबनराव म्हस्के यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले.कर्जत तालुक्यातील अपंगांच्या प्रश्नी लढा देत म्हस्के यांनी अपंगांचे अनेक प्रश्न मार्गी लावले होते. अपंगांना पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष केला. अपंगांना संघटित करुन त्यांनी अनेक आंदोलने केली.आ. बच्चू कडू यांच्या कार्यातून प्रेरणा घेत त्यांनी अपंगांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. प्रहार तालुकाध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्यासमवेत त्यांनी अनेक दिवस सामाजिक काम केले.जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष विनोदसिंग राजपूत, प्रहारचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गोरे, संभाजी बनकर, ऋषिकेश खेतमाळस आदींच्या उपस्थितीत निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. निवडीबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आदी क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या बैठकीत बबनराव म्हस्के यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
प्रहारच्या अपंग आंदोलन तालुकाध्यक्षपदी बबनराव म्हस्के
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:51
Rating: 5