Breaking News

घरफोडी करणारे गुन्हेगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात.

अहमदनगर ;- किराणा मालाचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघांना कारवाई करत कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींवर विविध गुन्हे दाखल असून तीन घरफोड्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. सुरज सुनील वाल्मिकी ( रा. इंदिरानगर झोपडपट्टी), विकास गणेश नायडू अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरीचे सामान व ३५०० रु रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात इसमाने पोलीस स्टेशनमध्ये फोन करून माहिती दिली की भिंगार परिसरातील मुरलीधर लुल्ला यांच्या कॉस्मेटिक दुकानामध्ये कुणीतरी शटर उचकटून चोरी केली आहे. ठाणे अंमलदार गायकवाड यांनी तात्काळ पेट्रोलिंग करणारे पोसई कवडे यांना माहिती दिली. कवडे यांनी पोहेकॉ शेख, पोना गोरे, पोकॉ साठे यांच्या समवेत घटनास्थळी हजार झाले. त्यांना पाहून पळ काढणाऱ्या इसमास त्यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली.

त्याचा दुसरा साथीदार विकास गणेश नायडू यास सपोनि संदीप पाटील, पोसई करेवाड, पोना राजेंद्र सुद्रिक आदींनी नगर सोलापूर रोडवरील कोंबडीवाला मळा याठिकाणावरून ताब्यात घेतले. यातील आरोपींवर विविध गुन्हे दाखल असून तीन घरफोड्यांची कबुली आरोपींनी दिली आहे.