बोईसरमध्ये पशु वैद्यकीय अधिकार्याची मनमानी
पालघर, दि. 21, फेब्रुवारी - बोईसर येथील पशु वैद्यकीय अधिकार्याच्या मनमानी कारभारामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून याचाच प्रत्यय नुकताच आला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेला एक कुत्रा दोन दिवस विव्हळत होता. याबाबतची माहिती येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असणार्या वैद्यकीय अधिकार्याला फोनवरून नागरिकांनी दिली असता आपण हाफडे असल्याचे सांगत त्याने आपली जबाबदारी झटकल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
बोईसरच्या नावापुर नाका येथे अपघाताने गंभीर जखमी अवस्थेत एक कुत्रा विव्हळत पडला होता. त्या कुत्र्याला उपचार मिळावे म्हणून प्राणीमित्र प्रकाश जैन आणि संजय त्रिवेदी यांनी येथील सरकारी पशु वैद्यकीय दवाखान्यात धाव घेतली. मात्र त्यावेळी सदर दवाखाना बंद होता. त्यांनी लागलीच तेथे लिहिलेल्या वैद्यकीय अधिका-याला मोबाईलवरून संपर्क साधला असता, त्यांनी हाफडेचे कारण सांगत स्वतःची जबाबदारी झटकली. त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा ते दवाखान्यात गेले असता, आपली तब्बेत बरी नसून त्यातच तुम्ही उशिरा आलात असे उलट उत्तर वैदकीय अधिकार्याने दिले. तसेच त्यांनी कंपाऊंडरला सोबत न्या किवा सोमवारी येण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय अधिका-याच्या अशा बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. तर अधिकार्यांना सरकारी नोकरीत गालेलठ्ठा पगार असताना पशुंवर उपचार होत नसल्यामुळे सरकारचा पैसा वाया जात असल्याची खंत प्राणीमित्र प्रकाश जैन यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे कामात बेपर्वाई करून प्राण्याचे जीव धोक्यात आणणारे पशु वैद्यकीय अधिकारी खोचर यांची तत्काळ बदली क रून पशूना न्याय देण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिका-याची ताबडतोब नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.