Breaking News

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी तरुणास पोलीस कोठडी

रत्नागिरी, दि. 20, फेब्रुवारी - चिपळूण शहरानजीकच्या पेढे-परशुराम येथील महाविद्यालयात शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या तरुणाला चिपळूणच्या न्यायालयाने येत्या 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शेखर करसन गोईल या तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. या घटनेची पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली. त्यामध्ये शेखर गोईल या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर या तरुणासह अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर शेखर गोईल याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता शेखरला पोलीस क ोठडी सुनावण्यात आली आहे.