Breaking News

धर्म, विज्ञान व शिक्षण यांचा उचित समन्वय समाज हितकारक - अनिल काकोडकर


ठाणे, दि. 20, फेब्रुवारी - प्राचीन काळी शिक्षण नसल्यामुळे धर्माचा प्रभाव समाजशिस्तीवर होता. नंतर वैज्ञानिक प्रगतीमुळे धर्म, विज्ञान, शिक्षण यांचा यथोचित समन्वय हा समाजाला हितकारी ठरला, असे उद्गार येथील पद्मविभूषण अनिल काकोडकर यांनी सारस्वत समाजाच्या रौप्य महोत्सव समारंभात बोलताना काढले. याप्रसंगी प्रसिद्ध तबलावादक भाई गायतोंडे यांनी कला व शिक्षणाची सांगड घालण्याची आवश्यकता प्रकट केली. सचिव रमेश कुळकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. साहित्यिक शरद पोतदार यांनी व ृत्तांतवाचन केले. अध्यक्ष दिवाकर नाडकर्णी यांनी सा-यांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.