Breaking News

मनोलीच्या सरपंचपदी शिंदे


तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणार्‍या मनोली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी उज्ज्वला शिंदे यांची यांची एकमताने निवड करण्यात आली. या ग्रामपंचायत निवडणुकीत आ. थोरात गटाने निर्विवाद विजय मिळविला. सरपंच निवडीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीला ग्रापंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी ए. जी. वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक, तलाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रक्रिया पार पडली. यावेळी डॉ. चव्हाण, प्रभाकर बेंद्रे, काशिनाथ साबळे, उपसरपंच डॉ. भागवत साबळे, सुमन शिंदे, बजरंग जानराव, शिवाजी शिंदे, सुदर्शन गोराणे, आशा भवर, नलिनी पराड, संदीप क्षीरसागर, रमेश शिंदे, भाऊसाहेब शिंदे, संजय शिंदे, मधूकर शिंदे, सूर्यभान पाचोरे आदी उपस्थित होते. आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, बाजीराव खेमनर, बाबा ओहोळ, सुरेश थोरात यांनी अभिनंदन केले.