आत्मविश्वासाने भवितव्य घडत असते : काशीनाथ पाटील नवले
भेंडा येथील जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले होते .
नवले या प्रसंगी म्हणाले की, दुरदृष्टीकोन व आत्मविश्वास ठेवून जगले तर कुठलीही शर्यत पूर्ण करणे आवघड नाही. यावेळी ज्ञानेश्वर स.सा.का.चे संचालक डॉ.नारायण म्हस्के, अशोक मिसाळ, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, प्राचार्य मालोजीराव भुसारी, उपप्राचार्य सुरेश साबळे,पत्रकार सुखदेव फुलारी, गणेश गव्हाणे.प्रा. भारत वाबळे, पर्यवेक्षक लक्ष्मण देवढे, अण्णासाहेब काटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून शिक्षकाप्रती ऋण व्यक्त केले. विदयार्थांच्या व शिक्षकांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक साहित्यिक भाऊसाहेब सावंत यांनी तर आभार प्राचार्य मालोजीराव भुसारी यांनी मानले.
