राजकीय वरदहस्तामुळे तक्रारीचा निकाल नाही : छल्लारे
यासंदर्भात छल्लारे यांनी सांगितले, की महाआघाडीचे नगरसेवक व नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे कट्टर समर्थक राजेंद्र पवार यांनी प्रभाग क्रमांक बारा अ मधून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे यांचे कट्टर समर्थक संजय छल्लारे यांनी उमेदवारी केली होती. त्यात संजय छल्लारे यांचा पराभव झाला. त्यांनंतर छल्लारे यांनी राजेंद्र पवार हे रयत शिक्षण संस्थेत कोपरगाव येथे कार्यरत असल्यामुळे व ते शासनाचे वेतन घेत असल्यामुळे त्यांचे पद रद्द करावे, यासाठी संजय छल्लारे यांनी जिल्हाधिकार्यांकडे धाव घेत पवार यांच्याविरोधात तक्रार केली होती. दरम्यान, अद्यापपर्यंत या तक्रारीचा निकाल लागला नाही. त्यामुळॆ राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप छल्लारे यांनी केला आहे.
