Breaking News

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सिध्देश्वर मंदिर प्रांगणात वृक्षारोपण


नेवासाफाटा/प्रतिनिधी/- महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील टोका येथील श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत १००८ बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

श्री सिद्धेश्वर मंदिर प्रांगण सुशोभीकरण कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी महंत १००८ बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते फुल झाडांसह सावली देणारे वृक्ष लावण्यात आले. वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैय्या कावरे यांनी या परिसरात शंभर वृक्ष लागवडीचा संकल्प केला.

यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैय्या कावरे, संत सेवेकरी रमेश गंगूले, रमेश राजगिरे, सुधीर चव्हाण, रामदास गव्हाणे उपस्थित होते. वृक्षारोपण काळाची गरज असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय कर्तव्य समजून वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर यांनी यावेळी बोलताना केले. सुशोभीकरण अंतर्गत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित भाविकांनी देखील सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.