अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील अशोक पंडीत व पं. समिती कर्जत येथील आस्थापना कर्मचारी वरीष्ठ लिपीक गणेश घोडके यांना निलंबीत करण्यात आल्याचा आदेश काढल्याने कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे. या दोन्ही कर्मचार्यांवर वेतन देयकामध्ये फेरफार करून 1 लाख 76 हजार 668 रू रक्कम काढल्याचा आरोप आहे. कर्मचार्यांच्या वेतन देयकात अनियमितता केल्याने अशोक अंबादास पंडित व गणेश घोडके याना जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले. सेवा निलंबीत कर्मचारी अशोक पंडित याच्यावर यापूर्वीही अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत. कर्जत पंचायत समिती येथे शिपाई या पदावर काम करत असताना गोर-गरीब, विधवा, परित्यक्ता, दलित, शोषितांकडुन पंचायत समितीतील विविध योजनांचा लाभाचे अमिष दाखवून पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी तत्कालीन अधिकार्यांकडे दाखल झालेल्या आहेत. त्यानंतर पशुसंवर्धन विभागात काम करीत असताना ही पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी शेतकर्यांना लाभ मिळवून देतो म्हणून याने एका खाजगी व्यक्तीमार्फत पैसे गोळा करण्याचा गोरखधंदाच मांडला होता. ज्यावेळी शेतकर्यांच्या तक्रारी वरून त्यास पकडण्यात आले, तेव्हा त्याने अशोक पंडितच्या सांगण्यावरूनच मी पैसे गोळा करीत असल्याचे सांगितले होते. पशु संवर्धन विभागांतर्गत काम करणार्या कर्मचारी यांचे डीसिपीएस योजनेचे फॉर्म भरणे हे याचे कर्तव्य असतानाही याने प्रत्येक कर्मचार्यांकडून 50 रु. वसूल केले, मगच फॉर्म भरला आहे, याविषयीची तक्रार मा. पदाधिकारी यांचेकडेही झाली होती. याची उचित चौकशी होणे आवश्यक असताना, कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे भावबंधाच्या वादातून मारहाण केल्याचा गुन्हा अशोक पंडित वर कर्जत पोलीस स्टेशनला दाखल आहे. 2016 साली एका दलित महिला कर्मचारी यांनी त्यांच्या बदली प्रस्तावाची फाइल मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडे सादर केली असताना, पंडित याने तो प्रस्ताव चोरून आणून 3 दिवस स्वतःकडे ठेवला होता. याबाबत सिसीटिव्ही फुटेज तपासून अशोक पंडित वर कारवाई करणे बाबत तक्रार वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार दाखल आहेत. परंतु त्याला कोणाचा तरी राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त मिळत असल्याचे बोलले जात आहे. याची खातेनिहाय चौकशी होणे आवश्यक असल्याची चर्चा दबक्या आवाजात जि. प. कर्मर्यांमध्ये चर्चा चालू आहे. कारण यापूर्वीही पंडित ने अनेक वेळा वेतन देयकात गैरव्यवहार केला असण्याची दाट शक्यता आहे. त्याच्याकडे वेतन देयकाचा कार्यभार असल्यापासून त्याने आत्तापर्यंत सादर केलेल्या सर्व वेतन व इतर सर्व देयकांची काटेकोर तपासणी होऊन सर्व दप्तर तपासणी होणे आवश्यक आहे. या कर्मचार्याने अशा प्रकारचे अनेक आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या असंख्य तक्रारी आहेत, अशा वेळी कार्यालयीन पदाधिकार्यांनी अशा कर्मचारयांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना व तशी तरतूद असतानाही केवळ निलंबन करून प्रकरण दाबण्याचा तर हा प्रकार नाही ना ? अशी शंका विक्रम कांबळे यांनी व्यक्त केली आहे. संबधित वरिष्ठ अधिकार्यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणीही विक्रम कांबळे यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील दोन कर्मचारी निलंबित
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:00
Rating: 5