Breaking News

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत बावीस कोटींचा निधी : आ. राहुल जगताप


श्रीगोंदा /प्रतिनिधी /- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना वित्तीय वर्ष सन २०१७-१८ बॅच २ अंतर्गत रस्त्यांची विकास करण्यासाठी श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२.०० कोटींचा निधी शासनाकडून मंजुर करुन घेतला आहे. तसेच पुढील ५ वर्षासाठी या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी २.०० कोटीचा अतिरिक्त निधीही मंजुर करण्यात आल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.

आ . जगताप म्हणाले की , या रस्त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील प्रजिमा ६१ ते ढवळेवाडी टाकळी लोणार ते कोसेगव्हाण रस्ताभाग (TR -०७) पॅकेज क्र. AHM-७८ कि.मी. ५.२० साठी ३४९.५५ लक्ष, पारगाव ते वडाळी भानगाव रस्ता (MRL-२९) पॅकेज क्र. AHM-७९ कि.मी. ६.५२ साठी ३८६.५७ लक्ष, प्रजिमा ५८ रजापुर ते शेळकेवाडी तालुका बॉर्डर रस्ता (RT-२१) पॅकेज क्र. AHM-८० कि.मी. ४.५० साठी २६२.७६ लक्ष, म्हसे ते प्रजिमा ५८ रस्ता राजापुर कवाष्टेमळा कोल्हेवाडी (TR-२०) पॅकेज क्र. AHM- ८१ कि.मी. ६.०० साठी ३९८.९३ लक्ष, रामा ६० ते सांगवी दुमाला रस्ता (MRL-०९) पॅकेज क्र. AHM-८२ कि.मी. ४.००साठी २९८.५१ लक्ष तसेच नगर तालुक्यातील बारदरी ते महालदरा खांडके रस्ता (MRL-०५) पॅकेज क्र. AHM-६३ कि.मी.३.६५ साठी २३९.२६ लक्ष, रामा २२२ ते रतडगांव रस्ता (MRL-१०) पॅकेज क्र. AHM-६४ कि.मी. ३.५० साठी २६२.२६ लक्ष असे श्रीगोंदा – नगर तालुक्यातील एकुण ३४ कि.मी साठी २२.०० कोटींचा निधी शासनाने मंजुर केलेला आहे.

या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होण्यासाठी प्रस्ताव दाखल करुन वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शासनाने या कामांना मंजुरी दिलेली आहे. सर्वांचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करतच आहे. मी केव्हाही आश्वासने देत नाही. प्रत्यक्ष कामावर माझा भर आहे. यापुढे देखील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील विकास कामांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. या रस्त्यांच्या कामासाठी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केलेली होती. मी इतराप्रमाणे नुसत्याच कोटीच्या गप्पा मारत नाही. तर प्रत्यक्ष कामे मंजुर झाल्यावरच बोलतो. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यतील रस्ते दर्जेदार होणार आहेत. तालुक्यातील सर्व गावे चांगल्या पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचा माझा मानस आहे. गेली ३० ते ३५ वर्षे जे रस्ते पक्के झाले नाहीत ते आता करण्याचे काम मी करत आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील २७ कि.मी व नगर तालुक्यातील ७ कि.मी. रस्ते पक्के होणार आहे. यासाठी २२.०० कोटींचा निधी मंजुर केलेला आहे. तालुक्यातील रस्त्यांचे जाळे भक्कम झाले आहे. रस्ते हा विकासाचा सर्वांत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे सर्वांचा विकास होण्यास मदत होते. रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करत आहे. अशी माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.