श्रीगोंदा/प्रतिनिधी/- तालुक्यातील आनंदवाङी गावचे सुपुञ ज्ञानदेव गिरमकर हे पुणे पोलिस विभागाच्या सेवेत कार्यरत आहेत नुकतेच त्यांनी पुणे शहरातील चोरीस गेलेल्या १०२ दुचाकी जप्त करुन रक्कम 28,48,000/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करुन दिला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.ज्ञानदेव गिरमकर हे रमेश गिरमकर यांचे बंधू तर ,अहमदनगरच्या जि.प.सदस्या पंचशिला रमेश गिरमकर यांचे दिर आहेत. ज्ञानदेव गिरमकर यांच्या कामगिरीचे तालुक्यात सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
ज्ञानदेव गिरमकरचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:15
Rating: 5