Breaking News

भीक मागा, पण गुंतवणूकदारांचे पैसे भरा मुंबई उच्च न्यायालयाने डीएसके यांना सुनावले खडे बोल


मुंबई : गुंतवणूकदारांचे पैसै देण्यासाठी वेळ पडल्यास डीएसकेंनी भीक मागावी, पण कोर्टात पैसे भरावेत, अशा कठोर शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी डीएसके यांना सुनावले. 50 कोटींची रक्कम जमा करण्यास डीएसके पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर उच्च न्यायालयाने याबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या 13 डीएसकेंनी स्वतः न्यायालयात हजर राहावे, असे निर्देशही न्यायालयाने दिलेत. यासोबतच तपास अधिकार्‍यांनी डीएसकेंविरोधात आतापर्यंत काय कारवाई केली याचाही तपशील सादर करा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. दरम्यान, प्रभुणे यांच्याकडून डीएसके यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाही. आंतरराष्ट्रीय बँकेनं मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने पैसे जमा न करू शकल्याचे अरविंद प्रभुणे यांनी न्यायालयात उपस्थित राहून सांगितले तर यावेळी डीएसकेंच्या वकिलांनी लिलावासाठी चार संपत्तींचा तपशील क ोर्टासमोर सादर केला पण या मालमत्तांचा लिलाव केला तरी ठेवीदारांची देणी यातून भागणार नाहीत. कारण या मालमत्तांचे मूल्य सरकारी किंमतीनुसार 328 कोटी इतके आहे. तर गुंतवणूकदारांची देणी 600 कोटींच्यावर आहे. दरम्यान, डीएसकेंबाबत सरकारच्या भूमिकेबद्दलही कोर्टाने शंका उपस्थित केली. सरकार डीएसकेंबद्दल फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. डीएसकेंच्या प्रभावामुळे जर तुमचे अधिकारी कारवाई करत नसतील तर हे त्या अधिकार्‍यांचे वर्तन हे लाजिरवाणे आहे, डीएसके नेमक्या क ोणत्या तारखेला कोर्टात हजर राहतील ते उद्याच सांगा. मात्र येताना रिकाम्या हाताने येऊ नका, उसने घ्या, भीक मागा, काहीही करा पण लोकांचे पैसे परत करा, अशा शब्दात न्यायालयाने डीएसके यांना फटकारले.