Breaking News

नैतिकतेचे स्वयंघोषित रक्षक बनू नका

नवी दिल्ली : जर दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने विवाह करत असतील, तर तिसर्‍या व्यक्तीने आडकाठी करण्याचा प्रश्‍नच येत नसून, खापपंचायतीने नैतिकतेचे स्वयंघोषित बनू नक ा, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतीनां सुनावले. खाप पंचायतींच्या लग्नविषयक धोरणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या या चिकेवर अंतिम निर्णय 16 फेब्रुवारीला देण्यात येणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहेत.


दोन सज्ञान व्यक्तींच्या लग्नात नाक खुपसणारे तुम्ही कोण? असा सवाल खाप पंचायतीच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयाने विचारला. ‘कायदा त्याच्या पद्धतीने काम क रेल. तुम्ही अशा जोडप्यांबाबत काळजी करु नका. कायदा आहे आणि कायदा त्याचं काम करेल. ज्या दोघांचे लग्न झाले आहे, त्यांच्या अधिकारांबाबत आम्हाला चिंता वाटते’ असं कोर्ट म्हणाले. 


कुठल्याही तरुण किंवा तरुणीला समन्स बजावून खाप पंचायत लग्न करण्यापासून थांबवू शकत नाही. सज्ञान तरुण-तरुणीला लग्न करण्यापासून रोखणे बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. खाप पंचायतीवरील सुनावणी दरम्यान एका याचिकाकर्त्याने दिल्लीतील फोटोग्राफर अंकिता सक्सेनाच्या हत्येचे प्रकरण उचलून धरले. अंकितची हत्या हे ऑनर किलिंग आहे, दोषींवर तात्काळ कारवाई व्हायला हवी, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. मात्र हे प्रकरण आमच्यासमोर न आल्यामुळे त्यावर काही बोलू शकत नाही. तसेच आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणार्‍या दाम्पत्यांना सुरक्षा पुरवण्यासंदर्भात पोलिसांची उच्चस्तरीय समिती नेमण्याबाबत विचार सुरू असल्याचे देखील न्यायालयाने यावेळी सांगितले.