Breaking News

राहुरीच्या तरुणाची शिर्डीत फसवणूक


राहुरी येथील उत्तम गंगाधर बनसोडे {रा. राहुरी} या तरुणाची शिर्डीत आर्थिक फसवणूक झाली. या तरुणाचे ७० हजार रु. किंमतीचे कॅमेरा, मोबाईल, मेमरीकार्ड असे सर्व साहित्य चोरीला गेले. दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बनसोडे याला झोप लागल्याने पहाटेच्या वेळी अनोळखी इसमाने मोबाईल कॅमेरा, एक ड्रेस सर्व साहित्य अंदाजे किंमत जवळपास ७० हजाराचा ऐवज घेऊन पोबारा केला. पोलिसांनी न्याय द्यावा, अशी मागणी बनसोडे याने केली आहे.