Breaking News

खंदारमाळवाडीत विकासकामे सुरुच ठेवणार : डोके


खंदारमाळवाडी हे गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त होण्यासाठी वाडयावस्त्यांवर जाऊन प्रबोधन करण्यात आले. यासोबतच रस्तेही चांगले व्हावे, यासाठी १४ व्या वित्त आयोग अंतर्गत गावात सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांच्या कामालाही आजपासून सुरुवात करण्यात आली. यापुढेही अशा प्रकारची विकासकामे सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार सरपंच वैशाली डोके यांनी व्यक्त केला. 

तालुक्याच्या पठार भागातील खंदारमाळवाडी येथे १४ व्या वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ शनिवारी {दि. २४} झाला. यावेळी त्या बोलत होत्या. उपसरपंच प्रमोद लेंडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके, डॉ. आदित्य साळगट, ग्रामसेवक भारत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते