Breaking News

सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण


शिर्डी/प्रतिनिधी ;- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या भक्त निवासासमोर शनिवारी {दि.२४} रात्री १० च्या सुमारास गर्दी करून गोंधळ घालणाऱ्या तरुणांना सुरक्षा रक्षक तुळशीराम गोपाळ शिंदे यांनी ‘भक्तांना त्रास देऊ नका, बाहेर जा’ असे सांगितले. मात्र याचा राग आल्याने दीपक बडबुजर, बबलू बडबुजर आणि त्यांच्या साथीदारांनी शिंदे या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. शिर्डी पोलिसांनी या मारहाणीची गंभीर दाखल घेतली. यात मारहाण करणारे व त्यांना मदत करणारे तसेच ज्या दुचाकीचा यात वापरझाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरविली आहेत. या घटनेचा तपास पो. नि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप मंडलिक हे करीत आहेत.