Breaking News

ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन


गेल्या 11 फेब्रुवारी रोजी येथील पावसकर रुग्णालयामध्ये ज्ञानदा प्रणव पोळेकर यांचा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. त्या प्रक रणाची सखोल चौकशी व्हावी, असे निवेदन रत्नागिरी तालुका युवा सेनेतर्फे जिल्हा शल्यचिकित्सकांना आज देण्यात आले. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुका युवाधिकारी तुषार साळवी यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे सुपूर्द के ले. या सर्व प्रकाराला आळा घालावा, ज्ञानदा प्रणव पोळेकर यांच्या मृत्यूच्या कारणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींना कडक दंड शासन व्हावे, अशा घटना पुन्हा घडू नयेत असे निवेदनात म्हटले आहे.