भाजप सरकारच्या निषेधार्थ लोणावळा काँग्रेसचे ’पकोडे तळो’
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध नोंदविण्याकरिता लोणावळा शहर कॉग्रेस आयच्या वतीने आज शिवाजी महाराज चौकात पकोडे तळो आंदोलन करण्यात आले. अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशातील सुशिक्षित मुलांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला होता.
तर, राज्यातील 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी तावडे यांना जाब विचारला असता त्यांनी विद्यार्थ्यांची खिल्ली उडवत त्यांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला. भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी देशाला रोजगाराची मोठी संधी देऊ असे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात मात्र बेरोजगारी वाढत असताना सत्ताधारी शिकलेल्या विद्यार्थ्यांना नोक-या देण्याऐवजी मुलांना पकोडे तळण्याचे सल्ले देत असल्याने यांचा निषेध नोंदविण्याकरिता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आंदोलनात आंबेकर यांच्यासह महिलाध्यक्षा डॉ. चिंतामणी, नगरसेवक कविश्वर यांनी भाजपा सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. तसेच देशाच्या सीमेवर पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आंदोलन सुरु होण्यापूर्वी श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली.