सिद्धटेकचा ऐतिहासिक वटवृक्ष प्रदूषणाने काळवंडला. बालपर्यटकांचे निसर्ग सानिध्याचे स्वप्न धुळीला; परिसर बनला बकाल!
कुळधरण/ किरण जगताप ;- अष्टविनायकांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथील सिद्धिविनायक मंदीरासमोरील वडाचे झाड प्रदूषणाने काळवंडते आहे.धुळीचे लोट आणि झाडाखाली अतिक्रमणात वाढलेल्या रसवंती गृहांतुन बाहेर पडत असलेल्या धुराने वडाचे झाड कोमेजून गेले आहे. पर्यावरणाच्या र्हासाचे ग्रामीण भागातील सिध्दटेक हे अव्वल उदाहरण बनले आहे. प्रशासकीय विभागांच्या हलगर्जीपणामुळे हे देवस्थान बदनाम होत चालल्याच्या भाविकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
सिध्दटेकच्या सिद्धिविनायक मंदीरासमोरील दगडी प्रवेशद्वारालगत भव्य आकाराचा वटवृक्ष आहे. मंदिर परिसराला शोभा देणार्या या वटवृक्षाने सुमारे 5-6 गुंठे क्षेत्र व्यापलेले आहे. अनेक पिढ्यांचे साक्षीदार असलेल्या या झाडाच्या सावलीत भाविक विसावत असत. मात्र सध्याची परिस्थितीच बदलून गेली आहे. झाडाचा आश्रय घेत त्याच्या छायेखाली 30 ते 40 व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. निम्म्याहून अधिक दुकाने रसवंतीची आहेत.ऊसापासून रस काढण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर केला जात असल्याने त्याच्या धुराने वडाच्या पानांवर काजळी साचली आहे. रस्त्यावरील वाहनांमुळे धुळीचे लोटच्या लोट येथे येत असुन पानांवर थर जमा झालेले आहेत.
भीमा नदीच्या तीरावर वसलेले हे देवस्थान निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. टेकडीवर वसलेल्या या तीर्थक्षेत्राच्या सर्व दिशांनी हिरवा निसर्ग आहे. त्याचा आनंद घेण्याच्या हेतूनेही भाविक याकडे पाहतात. मात्र मंदीरासमोरच्या दर्शनी भागातच वडाच्या झाडाचा श्वास कोंडल्याचे चित्र आहे.व्यावसायिकांना वावरण्यासाठी अडचण ठरत असलेल्या झाडाच्या फांद्याही येथे छाटल्या जात आहेत. एकेकाळी झाडाखाली मनमोकळेपणे बालकांना खेळण्याबागडण्याचे हे ठिकाण आजमितीस व्यावसायिकांनी व्यापले आहे. भव्य आकाराच्या वटवृक्षाखाली चिमुकली बालके खेळत बागडत होती. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या देवस्थानाचे नाकच व्यावसायिकांनी दाबल्याने सिध्दटेक गुदमरून गेले आहे.