देशात जातीय तेढ निर्माण करुन अशांतता पसरविणा-यांस अटक करण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की ,मिलिद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे, आनंद दवे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन सुध्दा त्यांना अटक न करता संरक्षण देणे. हा न्याय प्रक्रियेचा अपमान आहे.तरी त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी. तसेच सदर हल्याच्या निषेधार्थ शांततापुर्वक व सांविधानिक मार्गाने आंदोलन करणा-या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे. त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. जिल्हा लातुर तालुका अहमदपुर येथील टेंभुर्णि गावातील मागासवर्गीय वडार समाजातील कोमल पवार या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. परंतु प्रमुख आरोपी अद्यापी मोकाट फिरत आहेत. त्यांना अटक करुन कारवाई करण्यात यावी. या निवेदनानुसार तात्काळ कारवाई न झाल्यास संपुणँ देशभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
निवेदनावर जिल्हा संयोजक , बहुजन क्रांती मोर्चाचे राजेन्द्र करंदिकर, तालुका संयोजक अविनाश देशमुख, बलुतेदार संघटना अध्यक्ष मधुकर पठारे, अल्पसंख्यांक विभागाचे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शब्बीर शेख, भारतीय युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल भालेराव, भारतीय बेरा मोर्चाचे रविंन्द्र साळवे, भारतीय विद्यार्थी मोर्च्याचे सौरव बोरुडे, नपा संघटनेचे संपत पवार, अमित जाधव, स्वप्नील धोञे, पांडुरंग गायकवाड, कैलाश केदार, अशोक जाधव, सुरेश रोकडे, संदीप राजगुरु,नितीन पाडळे, सुरेश धोञे,निखिल गायकवाड, अजय जगताप, रविंन्द्र कांबळे, डेव्हीड तडके आदिंच्या सह्या आहेत