श्री क्षेत्र बहिरवाडी येथे वेदमंत्राच्या जयघोषात श्री कालभैरवनाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
यावेळी श्री क्षेत्र बहिरवाडीचा परिसर "नाथांच्या नावाने चांगभल"च्या जयघोषाने दुमदुमला. श्री क्षेत्र बहिरवाडी येथे कालभैरवनाथांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त त्रिदिनात्मक कार्यक्रमाचे व शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गुरुवर्य भास्करगिरी महाराज समवेत महंत चंद्रशेखर भारती महाराज,आमदार बाळासाहेब मुरकुटे,विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते.