’मिशन साहसी’ च्या तृतीय सत्रातील पहिला दिवस उत्साहात संपन्न
मुंबई - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट चे संयुक्त विद्यमाने प्रशिक्षक शिफूजी मिशन प्रहार च्या माध्यमाने आयोजित ’मिशन साहसी’ कार्यक्रमाच्या तृतीय सत्रातील पहिला दिवस म्हणजे शनिवारी बीपीसीए महाविद्यालय, वडाळा, मुंबई येथे पार पडला.
तृतीय सत्रातील पहिल्या दिवशी जवळपास 3200 पेक्षा जास्त विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. ’मिशन साहसी’ चे मुख्य उद्दिष्ट महिलांना आत्मसन्मानी आणि सशक्त बनण्याचे प्रशिक्षण देणे असून प्रशिक्षक लीजेंडरी ग्रँडमास्तर शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी विद्यार्थीनींना विविध परिस्थितीचा सामना करण्याचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले. विविध परिस्थितीत मुख्यतः पेनाचा वापर करणे, हातातील कड्याचा वापर करणे तसेच हातांचा योग्य त्या वेळी वापर करुन समोरच्या व्यक्तिवर प्रतिकार करणे व शोषण रोखणे अशा विविध प्रकारच्या गोष्टींतून प्रशिक्षण दिले गेले. यामधील उल्लेखनीय गोष्ट अशी की, या विशिष्ट कार्यक्रमाच्या प्रथम शिबिराची सुरुवात 7 फेब्रुवारी, 2018 ला कांदिवली पुर्व मधील ठाकुर कॉलेजच्या मैदानात झाली.