Breaking News

पुण्यात घरफोड्या करणार्‍या टोळीला अटक


पुणे - पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा परिसरात दिवसा नर्सरीत काम करून रात्री कारमध्ये पुण्यात येऊन विविध भागात गेल्या तीन वर्षांपासून घरफोड्या करणार्‍या चौघांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आरोपींसह चोरीचे सोने विकत घेणारा कारागीर यांना अटक करून त्यांच्याकडून 25 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. जगशी मंगा बुटीया, राकेश उर्फ राजेश पोपट वाघमारे, भरत विरजी बुटीया, जयंती के शव बुटीया अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणारा बंगाली कारागीर शंकर सुफलचंद्र बारुई (39, मु.रा.कलकत्ता) याला तळेगाव दाभाडे येथून अटक करण्यात आली. गेल्या 12 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास पोलिसांना एक कार संशयिरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी पोलिसांनी त्यांच्या क ारची तपासणी केली असता त्यात घरफोडीचे साहित्य आढळले. दरम्यान, आरोपींची चौकशी केली असता आपण सर्वजण दिवसा नर्सरीत काम करायचे. त्यानंतर रात्री कारमध्ये पुण्यात जाऊन घरफोडी करत असल्याची कबुली त्यांनी दिली.