Breaking News

बेलपिंपळगाव येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी.


नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शिव जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली  बेलपिंपळगाव येथील श्री हनुमान विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी या वेळी ढोल ताशांच्या तालावर शिव गर्जना करत गावात फेरी काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आई साहेब जिजाऊ आणि मावळे यांची वेशभूषा करून शिव जन्मोत्सवावाची शोभा वाढली.तर काही विद्यार्थीनी डोक्यावर कलश घेऊन शिव गर्जना करत गावात फेरी काढण्यात आली याचं वेळी गावांतील शिव भक्तांनी मोटरसायकल वर मिरवणूक काढली. 

श्री हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यी व शिक्षकांनी गावातील शिव स्मारकाचे पुजन करून वंदना केली . नंतर विद्यार्थ्यीनीनी लेझीम खेळत ग्रामस्थांची मने जिंकली व शाबासकीची थाप आपल्या पाठीवर घेतली.या वेळी शिवप्रेमी सर्व शिवभक्त व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच यावेळी गावातील श्री हनुमान पतसंस्था, श्री हनुमान सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते