संगमनेरात दुचाकी जाळण्याचे सत्र वाहनधारकांत भिती
अकोले नाका परिसरात एल आय सी कार्यालयासमोरसमोर अॅक्टीव्हा स्कुटी जाळण्यात आली. ही दुचाकी जाळण्यापुर्वी या परिसरात काही जणांत मोठा वाद निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलिस पोहोचल्यानंतर दुचाकीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. मात्र येथील वाद आपसात मिटल्याने यासंदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.
दुसऱ्या घटनेत मोमीनपुरा परिसरात दुचाकी खरेदीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गुलाम मोहमद यांच्या दुकानासमोर साखळीने बांधलेल्या दोन दुचाकी मोटारसायकली रात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने त्यांचेदेखील मोठे नुकसान झाले. पेटवून दिलेल्या दुचाकीत बजाज डिस्कव्हर {क्र. एमएच ४४ ई ५०१६} व बजाज बॉक्सर {क्र. एमएच १७ बी ८९३५} या वाहनांचा समावेश आहे. मध्यरात्रीच्यावेळी या दुचाकी पेटवून देण्यात आल्याचे समोर आले. या घटनेनंतर जवळच एक रिक्षादेखील पेटविण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. एकाचवेळी शहरात जवळपास दोनशे मीटर अंतरात घडल्याने हे कृत्य कोणी केले, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
