Breaking News

पालघर जि.प.च्या आवारातील झाडे सुकली ; पर्यावरण संतुलनाचा उडला फज्जा

पालघर, दि. 21, फेब्रुवारी - देशातील पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश नेहमीच शासकीय विभागाकडून दिला जात असतो. मात्र, आपल्याच इमारतींच्या आवारातील झाडे जगविण्याकडे या विभागांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पालघर जिल्हा परिषदेच्या आवारातील सुकलेल्या झाडांवरून स्पष्ट होताना दिसत आहे.

वनविभागाकडून सर्वच ग्रामपंचायतीकडून मोठा गाजावाजा करीत वृक्षरोपणाचे कार्यक्रम पावसाळ्यात दरवर्षी घेण्यात येतात. यावेळी आपल्या इमारतीच्या आवारासह सार्वजनिक ठिक ाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावली जातात. मात्र, त्या झाडांचे संगोपन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक झाडे सुकून मारतात व त्याच खड्यात पुढल्या वर्षी पुन्हा व ृक्षारोपण केले जाते. असे ब-याचदा होताना दिसते. पालघर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात हि अशीच काहीशी झाडे कुंडीत लावण्यात लावली आहेत. मात्र त्या झाडांना पाणी टाकण्यात न आल्याने ती झाडे सुकल्याने हा एक चर्चेचा विषय बनुन राहिल्ला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणा-या जिल्हा प रिषदेने आधी स्वतः आपल्या कार्यालयाच्या आवारातील झाडे जागवावी, अशी चर्चा येथे येणार्‍या नागरिकांतून केली जात आहे.