Breaking News

स्थायी समितीच्या रिक्त पदांवर 8 सदस्यांची नियुक्ती


पुणे, दि. 21, फेब्रुवारी - स्थायीमधील आठ रिक्त सदस्यांची आज सर्वसाधारण सभेत नियुक्ती करण्यात आली . त्यात भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्यांचा समावेश आहे. महापालिकेच्या कारभाराचा गाडा हाकणारी आणीच्या चाव्या हातात असणारी स्थायी समिती कधीही बरखास्त होत नाही. या समितीच्या आठ सदस्यांची दर दोन वर्षांनी मुदत संपते. तेवढेच सदस्य पुन्हा नव्याने निवडले जातात. स्थायीच्या सदस्यांची एकूण सदस्यसंख्या 16 इतकी आहे. पालिका निवडणुकीनंतर अस्तित्वात येणार्‍या स्थायी समितीमधील आठ सदस्यांना केवळ एक वर्षाचा कालावधी मिळतो. त्यानुसार स्थायीमधील आठ सदस्य समितीमधून बाहेर पडले आहेत. त्यात अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्याची जागा रिक्त झाली होती त्याजागेवर आज नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भाजप योगेश मुळीक , दिलीप वेडेपटील, रंजना टिळेकर, उमेश गायकवाड कडून, कॉग्रेसकडून वैशाली मराठे राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्मिता कोंढरे, लक्ष्मी दुधाने शिवसेने कडून संगीता ठोसर यांचा समावेश आहे.