Breaking News

शाळासिद्धी प्रकल्पाच्या बाह्य मूल्यांकनाला स्थगिती


रत्नागिरी, दि. 21, फेब्रुवारी - राज्य शासनाच्या शाळासिद्धी प्रकल्पाच्या बाह्य मूल्यांकनाला शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. दहावी-बारावीची तोंडी आणि प्रात्य क्षिक परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा याच कालावधीत आहेत. या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. या काळात शिक्षक किंवा मुख्याध्यापक अन्य शाळा तपासायला बाहेर गेले, तर मुलांच्या मार्गदर्शनाचा प्रश्‍न निर्माण झाला असता. परीक्षा कालावधीत बाह्य मूल्यांकन होऊ नये म्हणून मुख्याध्यापक महामंडळाकडून शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, सुनील मगर यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगण्यात आली. विद्यार्थीहित लक्षात घेऊन या बाह्य मूल्यांकन तात्पुरते स्थगित केल्याचे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाक डून देण्यात आले. या निर्णयामुळे पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.