Breaking News

...तर जीवनात नापास व्हाल : गटकळ


शालेय जीवनात कॉपी करून एकवेळ उत्तीर्ण होता येईल. मात्र जर सत्य जीवनात प्रामाणिकपणे कष्ट केले नाही तर प्रत्येक वाटेवर नक्कीच नापास व्हाल, असे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर गटकळ यांनी केले. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील हनुमान विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, की आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. गावाचे आणि शाळेचे नाव देशात अग्रेसर करा. निरोप हा आलेल्या पाहुण्यांना देतात. विद्यार्थ्यांना कधीच निरोप दिला जात नाही. शाळेचा निकाल शंभर टक्के लावा.

यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी वैभव शिंदे, वैभव डिके आदी विद्यार्थीनी प्रतिनिधी हाफिजा सय्यद, अश्विनी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.